उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या ग्रामीण भागात एक भीषण दुर्घटना घडली आहे. सीतापूरहून उनाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह तलावात उलटून १० जणांचा मृत्यू झाला. तर ३७ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तलावातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याशिवाय तलावात आणखी काही लोक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या शोधासाठी एसडीआरएफचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी घडली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.
पोलिसांनी सांगितले की, ट्रॅक्टर ट्रॉलीतील सर्व लोक सीतापूरहून आले होते आणि त्यांना उनाई देवी मंदिरात मुलाचे मुंडण करण्यासाठी जायचे होते. इटौंजाच्या तलावाजवळ चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर व ट्रॉली तलावात उलटली. त्यातील सर्व लोक तलावात पडले. यातील दहा जण ट्रॉलीखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अन्य ३७ जण जखमी झाल्याने स्थानिक लोक आणि एसडीआरएफ टीमने त्यांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावात अजूनही शोध मोहीम सुरू असून आणखी एक ते दोन जण तलावात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.