ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट नेमकी का झाली असावी यामागचं कारण समजू शकलेलं नाही. #MeToo प्रकरणात अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्या सगळ्यातून नाना पाटेकर सहीसलामत बाहेर पडले. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला नाना पाटेकर का गेले असतील? या प्रश्नावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपूर्वीच अभिनेते नाना पाटेकर यांनी कोल्हापूर आणि सांगली येथे जाऊन पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेतल्या. कोल्हापूरकरांची, सांगलीकरांची दुःखं अमित शाह यांच्या कानावर घालून लवकरात लवकर मदत पाठवण्यासंदर्भात त्यांनी विनंती केली का? हे समजू शकलेले नाही. मात्र दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच नाना पाटेकर अमित शाह यांच्या भेटील का आले असतील? याचे अंदाजही लढवले जाऊ लागले आहेत. काही वेळापूर्वीच नाना पाटेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली? भेट किती वेळासाठी घेतली होती? या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

सोशल मीडियावरही या भेटीसंदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये संसदेच्या आवारातून नाना पाटेकर अमित शाह यांच्या कार्यालयाकडे जाताना दिसत आहेत. दिल्लीत नाना पाटेकर आले आणि त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली मात्र ती भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती हे अद्याप कळू शकलेलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor nana patker meets hm amit shah in delhi scj
First published on: 19-08-2019 at 20:14 IST