हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या संशोधन अहवालामुळे अदाणी उद्योग समुहाची बाजारात घसरण सुरूच आहे. या अहवालात गौतम अदाणी आणि त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचे परिणाम आता बाजारात दिसू लागले आहेत. कंपनीने शुक्रवारी ३.४ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गमावले आहे. आज दुपारपर्यंत अदाणी समुहाच्या बाजार भांडवलात १८.५ टक्क्यांची घसरण झाली. मंगळवारपासून आतापर्यंत अदाणी समुहाने ४.२ लाख कोटी रुपयांची घट नोंदवली आहे.

अदाणी समुहामधील ९ पैकी ४ कंपन्यांचे स्टॉक शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत लोअर सर्किटपर्यंत घसरले. दुपारी 3 वाजता अदाणी ट्रान्समिशन, अदाणी आणि अदाणी टोटल गॅसचे शेअर्स प्रत्येकी २० टक्क्यांनी घसरले, तर अदाणी ग्रीन एनर्जी आणि अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स अनुक्रमे १९.९ टक्के आणि १९.३ टक्क्यांनी घसरले. यासह अदाणी पोर्ट्स (-१७.७ टक्के), अंबुजा सिमेंट्स (-१७.३ टक्के) आणि एसीसी (-१४.३ टक्के) देखील दिवसभरात वेगाने घसरले. अदाणी पॉवर आणि अदाणी विल्मारचे शेअर्सही लोअर सर्किटमध्ये पोहोचले होते. हे शेअर्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी घसरले होते.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

अदाणी समूह हिंडेनबर्गविरोधात कायदेशी कारवाईसाठी प्रयत्नशील

“आम्ही हिंडेनबर्ग संशोधनाविरूद्ध दंडात्मक कारवाईसाठी यूएस आणि भारतीय कायद्यांनुसार संबंधित तरतुदींची माहिती घेत आहोत, अशी माहिती जतिन जलुंधवाला यांनी दिले. जलुंधवाला अदाणी समूह प्रमुख (लीगल) आहेत.

हे ही वाचा >> Republic Day: पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं?

हिंडेनबर्गकडून प्रत्युत्तर

अदाणी समुहाकडून उत्तर मिळाल्यानंतर यावर हिंडेनबर्गकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने याबाबत म्हटलं आहे की, ते त्यांच्या अहवालावर ठाम आहेत. हिंडेनबर्गने म्हटलंय की, या अहवालाविरोधात जर कुठल्याही प्रकारची कायदेशी कारवाई झाली तर ती चुकीची ठरेल. हिंडेनबर्गने आक्रमक पवित्रा घेत म्हटलंय की, अदाणी समूह या अहवालाबाबत जर खरंच गंभीर असेल तर त्यांनी अमेरिकेतही खटला दाखल केला पाहिजे, कारण आम्ही इथेच काम करतो. आमच्याकडे त्यांच्याविरोधात कागदपत्रांची मोठी यादी आहे.