१२ मे रोजी कर्नाटक निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर १४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या किंमतींमध्ये तेल कंपन्यांनी वाढ केली. गुरूवारी पेट्रोलच्या किंमतीत २२ ते २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या किंमती २२ ते २४ पैशांनी वाढल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन ऑइल कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८३.१६ रुपये प्रतिलिटर झाले, तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७१.१२ रुपये झाले आहे. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ७५.३२ रुपये मोजावे लागत आहेत. जवळपास ५६ महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती ७६.३२ रुपयांना पोहोचल्या होत्या. एक लिटर डिझेलसाठी दिल्लीमध्ये ६६.७९ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांनी दिल्लीमध्ये गाठलेला हा उच्चांक असल्याचं बोललं जात आहे.

१२ मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर लगेचच इंधन दरवाढ सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी गुजरात निवडणुकांनंतरही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी तेथे जवळपास १५ दिवस सातत्याने एक ते तीन पैशांची कपात केली होती. मात्र, मतदानानंतर तेथेही दरवाढ झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After karnataka election petrol diesel price hiked on 4th day
First published on: 17-05-2018 at 12:09 IST