अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रविवारी हा सोहळा पार पडला. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाल्याचं समोर आलं आहे. शरद पवार यांनी कुणावरही नाराजी न व्यक्त करता आपण नव्या जोमाने काम करायला सज्ज आहोत असं म्हणत मैदानात उतरणं पसंत केलं आहे. त्याची सुरुवात त्यांनी कऱ्हाडपासून केली आहे. मात्र आता प्रशांत भूषण यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हटलं आहे प्रशांत भूषण यांनी?

१८ सप्टेंबर २०१४ चा व्हिडीओ प्रशांत भूषण यांनी ट्वीट केला आहे. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसण्यासाठी जेलमध्ये जातील. त्यासाठी त्यांनी शोलेतला डायलॉग आपल्या भाषणात वापरला आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांनी काय केलंय ते सर्वांना माहित आहे त्यामुळे ते तुरुंगात जातील असं या व्हिडीओत फडणवीस म्हणताना दिसत आहेत. हाच व्हिडीओ प्रशांत भूषण यांनी ट्वीट केला आहे.

प्रशांत भूषण पुढे म्हणतात, दादांना तुरुंगात पाठवणार होते, चक्की पिसिंगचं वक्तव्य केलं होतं. ते करता करता अजित पवार यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री झाले. अशी खोचक टीका प्रशांत भूषण यांनी केली आहे. प्रशांत भूषण यांनी केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावरही चांगलंच व्हायरल झालं आहे. १८ सप्टेंबर २०१४ रोजी जेलमध्ये पाठवण्याची भाषा फडणवीस यांनी केली. त्यानंतर २ जुलै २०२३ ला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असंही प्रशांत भूषण यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांनी रविवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासह आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलं की सगळ्या वरिष्ठांशी आमची चर्चा झाली आहे. यापुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही शिवसेना (एकनाथ शिंदेंची) आणि भाजपासह लढणार आहोत असंही अजित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर शरद पवारांनी आता रस्त्यावर उतरून नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.