आयपीएल २०२१ स्पर्धा करोनाच्या सावटाखाली खेळली जात आहे. खेळाडूंना बायो बबलमध्ये कडक नियमांचं पालन करावं लागत आहे. त्यात आयपीएल सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंना करोनाची लागण झाली. त्यानंतर करोनाच्या भीतीने काही खेळाडूंनी आयपीएल मध्यावरच सोडून मायदेशी परतले. तर काहींच्या नातलगांना करोनाची लागण झाल्याने त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली. आता पंच नितीन मेनन आणि पॉल रायफल यांनी आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

पंच नितीन मेनन यांच्या आई आणि पत्नीला करोनाची लागण झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफल ऑस्ट्रेलिया सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे चिंतीत होते. ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून येण्याऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादण्यापूर्वीच ते मायदेशी परतले.

धोनीच्या आई वडिलांची करोनावर मात

‘नितीन मेनन यांना एक लहान मुलगा आहे. त्यात त्यांची आई आणि पत्नी करोनाबाधित झालेत. तर रायफल फ्लाइटवर लादलेल्या बंधनामुळे चिंतेत होते. या दोघांच्या जागेवर आता दुसरे पंच मैदानात उतरतील’, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. ९ एप्रिलपासून सुरु झालेली आयपीएल स्पर्धा ३० मे पर्यंत आहे.

“…म्हणून मी मदत करण्याचा निर्णय घेतला”; कमिन्सकडून SRK आणि KKR कनेक्शनसंदर्भात खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा अॅड झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घरच्यांना करोनाची लागण झाल्याने आर. अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे.