एपी, तेल अविव

संपूर्ण गाझा पट्टीवर ताबा मिळविण्याचे आणि पॅलेस्टिनी भागात दीर्घ काळ राहण्याच्या नियोजनाला इस्रायलने सोमवारी मंजुरी दिली. इस्रायलच्या दोन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या नियोजनाची अंमलबजावणी झाली, तर पॅलेस्टिनी भागातील इस्रायलच्या कारवाया वाढणार असून, इस्रायलला आंतरराष्ट्रीय विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

इस्रायलच्या लष्कराने हजारोंच्या राखीव फौजेला आवाहन केल्यानंतर काही तासांतच इस्रायलच्या मंत्रिमंडळाची या नियोजनाला मंजुरी मिळाली. नव्या नियोजनानुसार, इस्रायलला युद्ध उद्दिष्टे गाठण्यास मदत होणार आहे. हमासचा पराभव आणि गाझामध्ये ठेवलेल्या इस्रायलच्या ओलिसांची सुटका याबरोबरच पॅलेस्टिनींना दक्षिण गाझाकडे आणखी ढकलणे ही उद्दिष्टे यामागे आहेत.

इस्रायल आणि हमासमधील शस्त्रसंधी करार मार्च महिन्याच्या मध्यात संपल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा पॅलेस्टिनी भागात हल्ले सुरू केले. त्यात शेकडोंचा मृत्यू झाला. आत्ता जवळपास निम्म्या गाझा पट्टीवर इस्रायलचा ताबा आहे. शस्त्रसंधी संपण्यापूर्वी इस्त्रायलने गाझा पट्टीकडे जाणारी मानवी दृष्टिकोनातून करण्यात येणारी मदत थांबविली. त्यात अन्न, इंधन आणि पाण्याचा समावेश आहे. तिथे अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, लूटमार होत आहे.

इस्रायलच्या नियोजनात काय?

● गाझा पट्टीवर ताबा मिळवून तेथे दीर्घ काळ राहणे

● मानवी दृष्टिकोनातून मदत पुरविण्यास हमासला मज्जाव करणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● हमासच्या विविध गटांना लक्ष्य करणे