Air Force officer attacked in Bengaluru Rode Rage : भारतीय हवाई दलाचा अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यावर रविवारी सायंकाळी बंगळुरूमध्ये काही व्यक्तींनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विंग कमांडर आदित्य बोस आणि त्यांची पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता हे जोडपे सी. व्ही. रमण नगर येथील डीआरडीओ कॉलनीतून कारने विमानतळाकडे जात असताना ही घटना घडली.

विंग कमांडर बोस यांनी इंस्टाग्रामवर या हल्ल्याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की दुचाकी चालकांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला आणि त्यांना कन्नड भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विंग कमांडर बोल यांच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर जखमांमुळे रक्त वाहताना दिसत आहे. त्यांनी आरोप केला की दुचाकी स्वाराने अचानक त्याचे वाहन या जोडप्याच्या कारसमोर थांबवले आणि त्यांना कन्नड भाषेत शिव्या देण्यास सुरूवात केली.

बोस यांनी दावा केला की त्यांच्या कारवर लावण्यात आलेले डीआरडीओचे स्टीकर पाहून हल्ला करणारा व्यक्ती आणखीच आक्रमक झाला आणि त्यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ करू लागला. जेव्हा बोस त्यांच्या कारखाली उतरले आणि त्याच्याशी बोलू लागले तेव्हा या दुचाकीस्वाराने त्यांच्या डोक्यावर चावीने वार केला.

View this post on Instagram

A post shared by Bozon Adityus Shilonov (@caimanemo333)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या वहानावर दगड देखील मारले, तसेच त्याने बोल यांच्या डोक्यावर वार केले. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बोस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तसेच त्यांनी घटनेवेळी जमलेल्या बघ्यांनी मदत करण्याऐवजी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याबद्दल निराशा देखील व्यक्त केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार याप्रकरणी औपचारिक तक्रार दिल्यानंतर एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे.