Air India बंगळुरुहून दिल्लीला जाणारं विमान उड्डाण घेण्याआधी एअर इंडियचा वैमानिक खाली कोसळला. ज्यानंतर या विमानाच्या उड्डाणाला चार तासांचा उशीर झाला. विमान उड्डाणासाठी अवघे काही क्षण राहिले असताना वैमानिक कोसळला. ज्यानंतर या वैमानिकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI 2414 हे पायलट कोसळून बेशुद्ध झालं त्यामुळे या विमानाने चार तास उशिरा उड्डाण केलं.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत काय माहिती दिली?

एअर इंडियाच्या प्रवक्त्यान दिलेल्या माहितीनुसार बंगळुरुहून दिल्लीला जाणारं विमान उड्डाण करण्यापूर्वी वैमानिकाला चक्कर आली. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. वैमानिकाला चक्कर आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. उड्डाणासाठी काही वेळ उरला होता त्याचवेळी ही घटना घडली. आता वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे अशीही माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. तसंच आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहोत असंही एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं.

वैमानिकाच्या कुटुंबाच्या पाठिशी आहोत-एअर इंडिया

ज्या वैमानिकाला विमान उड्डाणाच्या आधी चक्कर आली त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मात्र बंगळुरुहून दिल्लीला जाणारं हे विमान एअर इंडियाचा दुसरा वैमानिक घेऊन गेला. सध्या चक्कर येऊन खाली कोसळलेल्या कुटुंबाला आधार देणं हे आमचं कर्तव्य आहे. तसंच या वैमानिकाला लवकर आराम मिळावा यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत असंही प्रवक्त्याने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९ एप्रिलला घडलेली घटना काय होती?

आज घडलेल्या घटनेप्रमाणेच ९ एप्रिललाही एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फर्स्ट ऑफिसरचा विमान दिल्लीत उतरल्यानंतर कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याही घटनेत तो वैमानिक विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.