राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शनिवारी ( १० जून ) २४ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या निमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शरद पवारांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा विधानसभेची जबाबदारी दिली आहे. तर, प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी असेल. या निवडीनंतर खासदार वंदना चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. ते दिल्लीत ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली याचा आनंद आहे. प्रफुल्ल पटेल पक्षाचे उपाध्यक्ष तर होतेच. अन्यही ज्येष्ठ नेत्यांवर वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. ते परत मिळवण्यासाठी सर्व राज्यांत पक्षाचा विस्तार करावा लागेल,” असं वंदना चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचा : “‘तुमचा दाभोलकर करू’ ही धमकी नाही, असं म्हणणं…”, अजित पवारांनी बावनकुळेंना सुनावलं

शरद पवार यांच्यानंतर नेतृत्व कोणाकडे जाणार सुप्रिया सुळे की अजित पवार या प्रश्नाचं उत्तर आजच्या निवडीवरून मिळालं? असा प्रश्न विचारल्यावर वंदना चव्हाण यांनी म्हटलं, “शरद पवार निर्विवाद पक्षाचे नेतृत्व करतात. त्यामुळे नंतर पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळे की अजित पवार यांच्याकडे जाणार या गोष्टीचा आम्ही विचारसुद्धा करत नाही. शरद पवारांनी राजीनामा मागेच घेतला नसता तर… तेव्हा अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव दिला होता.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar proposal supriya sule working presidents in ncp say mp vandana chavan ssa
First published on: 10-06-2023 at 15:40 IST