मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात ४३ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांना पदमुक्त करण्यात आले, तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालय काढण्यात आले. आता त्यांच्याकडे फक्त महिला व बाल विकास मंत्रालय शिल्लक आहे. मोदी सरकारने मंत्रिमंडळात केलेल्या या बदलांवर विरोधक टीका करत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते अलका लांबा यांनी ट्विटच्या माध्यमातून स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करून लिहिले की, “आता स्मृती इराणी आपले संपूर्ण लक्ष महिला व बालविकासावर केंद्रित करू शकतील आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाला त्यांच्या साड्यांची बिलं भरण्याची गरज भासणार नाही.”
चलिए अब ईरानी अपना पूरा ध्यान महिला एवं बाल विकास पर लगा पायेगी और टेक्सटाइल मंत्रालय को मंत्री जी की साड़ियों के बिल नहीं चुकाने पड़ेगें. बाकी अब सब समय पर छोड़ दीजिए .#CabinetReshuffle https://t.co/Iu3DyytDsJ
— Alka Lamba (LambaAlka) July 8, 2021
हेही वाचा- PHOTOS: ‘मिर्झापूर ते दिल्ली’ अनुप्रिया पटेल यांचा राजकीय प्रवास
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर काल रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आलं. गुजरातचे मनसुख मंडाविया हे देशाचे नवे आरोग्यमंत्री असतील तर, माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नवे शिक्षणमंत्री असतील. ज्योतीरादित्य शिंदेंकडे नागरी उड्डाण मंत्रालय देण्यात आलं असून या खात्याची जबाबदारी असणारे हरदीप पुरी यांच्याकडे महत्त्वाचे पेट्रोलियम मंत्रालय देण्यात आलं आहे.
हेही वाचा- Explained: मोदींच्या मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार; ‘या’ १० गोष्टी जाणून घेणं महत्वाचं
प्रकाश जावडेकर यांचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आले असून किरण रिजीजू यांच्याकडील क्रीडा खात्याचेही ठाकूर केंद्रीयमंत्री असतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयही सांभाळणार आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.
