संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यासोबतच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर पंतप्रधानांनी संबोधनपर भाषण देखील केलं. या दौऱ्यामध्ये अमेरिकेनं तब्बल १५७ दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत. यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे. मोदींच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान या दुर्मिळ वस्तू अमेरिकेने दिल्या असून त्या आता पुन्हा भारतात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या १५७ वस्तूंमध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ कलाकुसरीच्या गोष्टींचा समावेश आहे. यात दहाव्या शतकातील रेवंता यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, तसेच १२व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्ती देखील आहे. शिवाय यातल्या साधारण ४५ कलाकुसरीच्या वस्तू या मध्ययुगीन काळातील आहेत. त्यात अनेक बौद्ध, हिंदु आणि जैन धर्मातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मूर्ती आहेत. तर निम्म्याहून अधिक कलाकुसरीच्या वस्तू या भारतीय संस्कृतीच्या द्योतक आहेत.

या सर्व वस्तू धातू, दगड आणि माती किंवा सिरॅमिकपासून बनवलेल्या आहेत. लक्ष्मी-नारायण, बुद्ध, विष्णू, शिव-पार्वती, २४ जैन तीर्थंकर, कनकलमूर्ती, ब्राह्मी, नंदिकेश अशा देवी-देवतांच्या ब्राँझच्या मूर्तींचा यात समावेश आहे. त्यासोबतच, इतरही अनेक देवी-देवता आणि भारतीय पुराणातील व्यक्तीमत्वांच्या मूर्ती यात आहेत.

याशिवाय, या संग्रहामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांची प्रतिकं असलेली अनेक दुर्मिळ शिल्प देखील आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America handed over 157 artefacts sculptures to pm narendra modi during his visit pmw
First published on: 26-09-2021 at 10:33 IST