“श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी वंग-भंग आंदोलन छेडल्यामुळेच पश्चिम बंगाल भारताला मिळाला, काँग्रेस त्यात पडले असते तर बंगालचा भारतातील उर्वरित भागही तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात गेला असता”, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. लोकसभेत जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२३ ची चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार प्रा. सौगत रॉय यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विषय काढून ते कधीच स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले नसल्याचे म्हटले. तसेच एकही हिंदुत्ववादी नेता तुरुंगात गेला नाही, असेही सौगत रॉय म्हणाले. यावेळी संतप्त झालेल्या अमित शाह यांनी त्यांचे विधान खोडून काढत थोडक्यात इतिहासाची मांडणी केली.

हे वाचा >> पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव; लोकसभेत विधेयक मंजूर

garibi hatao, Congress announcements, Nitin Gadkari, nitin gadkari criticises congress, poor got poorer, buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election campaign, mahayuti, bjp, marathi news,
“काँग्रेसच्या घोषणेने गरिबी तर हटली नाही, गरीब आणखी गरीब झाले,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका; म्हणाले…
mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Cm Himanta Biswa Sarma On Congress Manifesto
“हा तर पाकिस्तानच्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा”, हिमंता बिस्वा सरमांची खोचक टीका, म्हणाले…

काय म्हणाले सौगत रॉय ?

विधेयकाची चर्चा सुरू असताना सौगत रॉय म्हणाले की, जम्मू आण काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आमचा नाईलाज आहे. काल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी मोठमोठी विधानं केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काश्मीरमध्ये आता नवा सूर्योदय होईल. पण वास्तव परिस्थिती पाहिली पाहीजे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आमची लढाई आता सुरू झाली. त्यांनी तक्रार केली की, त्यांना नजरकैदेत ठेवले गेले होते. मेहबुबा मुफ्तीदेखील नजरकैदेत होत्या. तुम्ही एका बाजूला निवडणुका घ्या म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवतात, असा आरोप त्यांनी केला.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत जम्मू आणि काश्मीरमध्ये आनंदाचे वातावरण नाही. काश्मीरमधील राजकीय पक्ष या निर्णयाला पाठिंबा देत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी काश्मीरमध्ये एखादा मोर्चा निघाला का? अधीर रंजन चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे जर भाजपा सरकारमध्ये एवढी ताकद आहे तर त्यांनी चीनच्या ताब्यातून आपला अक्साई चीन हा प्रदेश मिळवून दाखवावा. काराकुरम महामार्ग काश्मीरमधून जातो, तो ताब्यात घेऊन दाखवा”, असे आव्हान सौगत रॉय यांनी दिले.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अर्धाच नमस्कार

“तुम्ही (भाजपा) म्हणता पंडीत नेहरूंमुळे काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात गेला. अमित शाह म्हणतात आम्ही श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या रस्त्यावर चालून हा भाग परत घेऊ. पण केव्हा घेणार? निवडणुका कधी लावणार? असा प्रश्न आहे. श्यामाप्रसाग मुखर्जी बंगाली असल्यामुळे आम्ही त्यांचा आदर करतो. पण हेदेखील सत्य आहे की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात श्यामाप्रसाद एकदाही तुरुंगात गेले नव्हते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लीम नेत्यासह युती करून एक मंत्रिमंडळ चालविले होते. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य होतं, ‘एक विधान, एक निशाण, एक प्रधान’. पण जो स्वातंत्र्यचळवळीत तुरुंगात गेला, त्यालाच मी पूर्ण नमन करतो, श्यामाप्रसाद यांना अर्धेच नमन करतो. त्यांच्याप्रमाणेच इतर एकही हिंदुत्ववादी नेता स्वातंत्र्यचळवळीत तुरुंगात गेला नाही.”

तसेच राम मंदिर, अनुच्छेद ३७० हटविणे आणि समान नागरी कायदा आणणे, भाजपाचे ध्येय असल्याचे अमित शाह सांगतात. पहिले दोन ध्येय तर पूर्ण झाले. समान नागरी कायदा हा सांप्रदायिक दुही निर्माण करणारा आहे. आम्ही त्याला विरोध करत राहू, असे सौगत रॉय पुढे म्हणाले.

श्यामाप्रसाद नसते तर बंगाल पाकिस्तानात गेला असता..

अमित शाह यांनी सौगत रॉय यांच्या विधानावर जोरदार नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “समान नागरी कायद्याती तरतूद भारतीय संविधानातच करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे पूजनीय जवाहरलाल नेहरू यांनीची समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करून ठेवली आहे. भविष्य काळात विधीमंडळ आणि संसद कोणत्या दिशेने चालले पाहीजे, यासाठी हे मार्गदर्शक तत्वे आखून दिलेली आहेत. पण तृणमूलचे खासदार काहीही बरळत आहेत.”

आणखी वाचा >> वंग-भंगाचे राजकारण

“ज्यांनी भारताचे तुकडे केले, ते मोहम्मद अली जीना कोणत्या पक्षाचे होते. शामाप्रसाद मुखर्जी यांनी वंग-भंग आंदोलन केले नसते, तर पश्चिम बंगाल आज भारताचा भाग राहिला नसता. काँग्रेसच्या रचनेप्रमाणे तर पश्चिम बंगाल पूर्व पाकिस्तानाला मिळाला असता. शामाप्रसाद मुखर्जी यांनी वंग-भंग आंदोलन उभे केल्यामुळे उरलेला बंगाल भारताचा हिस्सा आहे. मी इतक्या विकृत दृष्टीने इतिहासाचे आकलन केलेले पाहिले नाही. दुसरे वंग-भंग आंदोलन केवळ शामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळे झाले आहे”, असे प्रत्युत्तर अमित शाह यांनी दिले.