देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय प्रवासासंदर्भात भाष्य करणाऱ्या ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकाचं प्रकाशन काल म्हणजेच २७ एप्रिल रोजी मुंबईमध्ये झाले. मराठीमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या पुस्तकाचं प्रकाशन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी सर्वच मान्यवरांनी अमित शाहांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडून सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांबद्दल बोलताना जवळजवळ २० मिनिटांचं भाषण केलं. यामध्ये फडणवीस यांनी अमित शाहांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल भाष्य करतानाच त्यांच्या खासगी आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट सांगितलं.

नक्की वाचा >> गुजरात एन्काऊंटर प्रकरणांसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, “मोदींपर्यंत पोहोचण्यासाठी युपीए सरकारने अमित शाहांना…”

फडणवीस यांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना अमित शाहा कितीही व्यस्त असले तरी रोज रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान एका खास व्यक्तीला फोन करुन गप्पा मारतात. विशेष म्हणजे असा एकही दिवस जात नाही की अमित शाहा या व्यक्तींशी बोलत नाहीत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या व्यक्तीसंदर्भातील उल्लेख या पुस्तकात असल्याचं फडणवीस म्हणालेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती अमित शाहांच्या कुटुंबातील आहे.

Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

नक्की वाचा >> केंद्र सरकारकडून २६ हजार ५०० कोटींची जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर…; फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल

अमित शाह हे जितके कणखर आहेत तितकेच त्यांच्या व्यक्तीमत्वाचे इतरही पैलू आहेत असं फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं. अगदी २०१८-१९ च्या कालावधीमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांची भेट घेतल्यानंतर अमित शाह त्यांच्यासोबत ज्यापद्धतीने गाण्यांवर गप्पा मारत होते ते पाहून मला आश्चर्य वाटल्याचंही फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना फडणवीस यांनी पुस्तकामधील एक संदर्भ दिलाय. “अमित शाहा म्हटल्यानंतर एक अतिशय कणखर अशाप्रकारचं व्यक्तीमत्व आपल्याला पहायला मिळतं. कणखर तर ते आहेतच. पण त्यासोबत ते तेवढेच संवेदनशीलही आहेत,” असं फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> तीन हजार ४०० कोटींचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सरकारला नम्र विनंती करतो की…”

पुढे बोलताना फडणवीस यांनी, “या पुस्तकामध्ये आपल्याला आणखीन एक उल्लेख आपल्याला पहायला मिळतो. अमित शाह किती व्यस्त असेल तरी रात्रीच्या वेळी ते त्यांची नात आहे ऋद्री हिच्याशी फोनवर बोलल्याशिवाय एकही दिवस ते राहत नाहीत,” असं सांगितलं.

“रात्री नऊ साडेनऊच्यादरम्यान तिला ते रोज कॉल करतात आणि तिच्याशी रोज बोलतात. ही जी काही कुटुंबवत्सल असल्याची त्यांची ही जी काही बाजू आहे. ती बाजू देखील आपण समजून घेतली पाहिजे,” असं फडणवीस यांनी सांगितलं.