भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कारभारावर टीका केली असून हे सरकार साडेतीन मुख्यमंत्र्यांचे असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

उत्तर प्रदेश सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. अखिलेश यादव यांचे सरकार केंद्र सरकारच्या विविध योजना दलित आणि गरीबांपर्यंत पोहचू देत नसल्याचा आरोपही शहा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिकदृष्टय़ा गरीब आणि दलितांसाठी विविध योजना आणत आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारकडून या योजना पुढे जाऊ दिल्या नाहीत, असेही शहा म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशसाठी दिलेला दोन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी कुठे गेला असा सवालही यावेली शहा यांनी केला. प्रत्येक राज्यात एक मुख्यमंत्री असतो. मात्र, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव त्यांचे वडिल आणि चुलते असे मिळून साडेतीन मुख्यमंत्र्यांचे सरकार असल्याचे शहा म्हणाले.

उत्तर प्रदेशात यादव यांचे सरकार असेपर्यंत या राज्याचा विकास होणे अशक्य असून जनतेने सरकार बदलण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.