पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले निर्णय कसे घेतात याविषयी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी जोखीम पत्करून निर्णय घेतात, असं मत व्यक्त केलं होतं. यानंतर आता मोदी सरकारने प्रतिष्ठेचा निर्णय बनवलेले कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया देत ट्वीट केलंय. यात त्यांनी मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं म्हटलंय.

अमित शाह म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासियत म्हणजे त्यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यासाठी ‘गुरू परब’ या खास दिवसाची निवड केली. हा निर्णय घेताना प्रत्येक भारतीयाचं कल्याण या विचाराशिवाय इतर कोणताही हेतू नाही. त्यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाचे पुन्हा एकदा दर्शन घडवलं आहे.”

“मोदी जोखीम पत्करुन निर्णय घेतात”

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला १० ऑक्टोबरला विशेष मुलाखत दिली होती. त्यावेळी राजकारणात नेते धोका पत्करणे नाकारतात कारण त्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. पण पंतप्रधान मोदी जिद्दीने जोखीम पत्करतात आणि निर्णय घेतात असे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने विचारले. त्यावर अमित शाह म्हणाले होते, “मी तुमच्या मताशी सहमत आहे. पण हट्टीपणा हा शब्द बरोबर नाही. ते जोखीम पत्करुन निर्णय घेतात हे बरोबर आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. सरकार चावण्यासाठी सरकारमध्ये नाही आलो. आमचे लक्ष देशात बदल घडवून आणण्याचे आहे. १३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्माजनक जागी पोहोचवाचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.”

कृषी कायदे मागे घेताना पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

“आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणला आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणले,” असे पंतप्रधान म्हणाले.

“शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी तीन कृषी कायदे आणले. त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही हे केले. वर्षानुवर्षे ही मागणी होत होती. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही चर्चा व विचारमंथन झाले. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी हट्टाने नाही तर जोखीम पत्करुन निर्णय घेतात- अमित शाह

“आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान तो संसदेद्वारे मागे घेतला जाईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

“आज सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झिरो बजेट शेती अर्थात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, देशाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने पीक पद्धतीत बदल करणे. एमएसपी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी, भविष्याचा विचार करून अशा सर्व विषयांवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ यांचे प्रतिनिधी असतील,” असे पंतप्रधानांनी म्हटले.