टर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेत ४ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजार नागरीक जखमी झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर उद्योपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

हेही वाचा – Turkey-Syria Earthquake : टर्की-सीरियात महाविध्वंस! २४ तासांत तीन मोठे भूकंप; ३८०० जणांचा मृत्यू, १५ हजार जखमी

टर्की आणि सीरियामध्ये गेल्या २४ तासांत ७.८ रिश्टर स्केल, ७.६ रिश्टर स्केल आणि ६.० रिश्टर स्केल असे तीन मोठे भूकंप झाले. या भूकंपामुळे टर्की पूर्णपणे हादरले असून या भूकंपापूर्वी पक्षांचा विचित्र किलबिलाट बघायला मिळाला होता. त्याचा एक व्हिडीओ एका युजरने ट्वीटवर शेअर केला. या व्हिडीओ उद्योपती आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली. निसर्गाची स्वत:ची अलार्म सिस्टीम आहे. पण ती ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. आपण अजून निसर्गाशी तेवढं जुळवून घेऊ शकलेलो नाही, असं ते म्हणाले.

आनंद महिंद्रांच्या या ट्वीटला मोठ्या प्रमाणात युजर्सनी प्रतिसाद दिला आहे. १६०० युजर्सनी महिंद्रांचं ट्वीट रिट्वीट केलं असून १० हजार युजर्सनी ते लाईक केले आहे. तसेच २३० यावर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.

हेही वाचा – सीरियाच्या युद्धभूमीत नैसर्गिक आघाताने महाविध्वंस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, टर्कीतील भूकंपानंतर जगातील अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबाबत ट्वीट करून टर्कीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारत टर्कीतील लोकांच्या पाठीशी उभा आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या विनाशकारी भूकंपाचा सीरियावरही परिणाम झाला आहे. हे जाणून खूप दुःख झालं आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना, असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.