सलमान-आमिरची जोडी मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या दिग्गज निर्मात्याचे निधन

त्यांनी १९८३ साली ‘चोर पोलिस’ आणि १९९७ साली ‘नसीब’ या चित्रपटांची देखील निर्मिती केली

बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे केव्हाही पाहण्यासाठी चाहते तयार असतात. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘अंदाज अपना अपना.’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या वेळी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण काही दिवसानंतर चित्रपट हिट झाला. चित्रपटातील आमिर खान आणि सलमान खानची जोडी आजही प्रेक्षकांना पाहायला आवडते. पण हा ऐतिहासिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारे निर्माते विनय सिन्हा यांचे गुरुवारी २४ जानेवारी रोजी निधन झाले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल न्हाटा यांनी ट्विटरद्वारे या घटनेची माहिती दिली. ‘अंदाज अपना अपना चित्रपटाचे निर्माते विनय सिन्हा यांचे निधन झाले आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली. विजय सिन्हा यांची मुलगी प्रीति सिन्हाने चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने वडिलांचे अभिनंदन करुन आभार मानले होते. विजय सिन्हा यांनी १९८३ साली ‘चोर-पोलीस’ आणि १९९७ साली ‘नसीब’ या चित्रपटांचीदेखील निर्मिती केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Andaz apna apna producer vinay kumar sinha passes away avb

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या