केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. तसे निर्देश देणारे एक परिपत्रकही काढण्यात आले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका करण्यात आली. याच कारणामुळे केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय वन्यजीव संरक्षण महामंडळाने तसे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारचा निर्णय काय?

केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने या निर्णयाबाबत एक पत्र जारी केले होते. या पत्रात या आवाहनाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली होती. ‘जागतिक प्रेमदिन म्हणून १४ फेब्रुवारी हा सर्वांना चांगला ठाऊक आहे. हा दिवस संपूर्ण जगात आणि भारतातही साजरा केला जातो. मात्र, भारतात प्रेमदिनाला कायमच विरोध होतो. हा विरोध आता सरकारच्या पातळीवरदेखील होत आहे. त्याचे कारण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी एक पत्र काढून १४ फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात दत्ता यांनी म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते,’ असे या पत्रात म्हणण्यात आले होते.

गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते

‘मानवतेला सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळे गायीला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखले जाते. काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईला आलिंगन दिन म्हणून साजरा करावा आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करावे, असे या पत्रात म्हटले आहे. गायीला मिठी मारण्याचा दिवस साजरा करा, असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal welfare board of india withdraws appeal to celebrate february 14 valentine day as cow hug day prd
First published on: 10-02-2023 at 17:35 IST