scorecardresearch

Premium

बिहारमध्ये शालेय सुट्ट्यांवरून रंगलं राजकारण; हिंदू सणांच्या सुट्या कमी केल्याचा विरोधकांचा आरोप!

बिहार राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार २०२४ मध्ये शिवरात्री, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरतालिका आणि जितिया (जीवितपुत्रिका व्रत) यांसारख्या सणांना सुट्टी मिळणार नाही.

nitish kumar bihar
बिहारमधील शाळांच्या सुट्ट्यांचा निर्णय काय? (फोटो – संग्रहित छायाचित्र)

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२४ साठी दोन शालेय कॅलेंडर जारी केले आहे. यामुळे, बिहारमध्ये वाद निर्माण झाला आहे. उर्दू माध्यम शाळा आणि इतर माध्यमातील शाळांसाठी स्वतंत्र सुट्ट्यांची यादी तयार केल्याने भाजापने बिहार राज्य सरकारवर खरपूस टीका केला आहे.

बिहार राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार २०२४ मध्ये शिवरात्री, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरतालिका आणि जितिया (जीवितपुत्रिका व्रत) यांसारख्या सणांना सुट्टी मिळणार नाही. तर, उर्दू माध्यमांच्या शाळांना ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अधा (बकरीद) साठी तीन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. परंतु, उर्दू माध्यम नसलेल्या शाळांना दोन्ही ईदच्या सणांना फक्त एक दिवस सुट्टी असेल.

farmers protest
शेतकऱ्यांवर NSA अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर खट्टर सरकारकडून यू-टर्न; नेमके कारण काय?
police leave encashment
रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप
Anger among ST employees
भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीचा भरणा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : पक्षविस्तार नव्हे पक्षबुडीचा संकेत

या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना सुशील मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने हिंदूविरोधी चेहरा दाखवून हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला आहे. हिंदूंच्या सणांच्या सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. मुस्लिम सणांच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ बिहार. नितीश आणि लालू सरकारने शाळांमध्ये मुस्लिम सणांच्या सुट्ट्या वाढवल्या पण हिंदू सणांच्या सुट्ट्या संपवल्या. लालू यादव आणि नितीश सरकार ज्या प्रकारे हिंदूंवर हल्ले करत आहेत, भविष्यात ते मोहम्मद नितीश आणि मोहम्मद लालू म्हणून ओळखले जातील”, त्यांनी X वर लिहिले.

राज्याच्या शिक्षण विभागाने २७ नोव्हेंबर रोजी उर्दू माध्यमाच्या शाळा आणि उर्दू माध्यम नसलेल्या शाळांसाठी कॅलेंडर जारी केले. राज्याच्या शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, शिक्षणाच्या अधिकारांतर्गत किमान २२० अध्यापन दिवस सुनिश्चित करून हे कॅलेंडर तयार करण्यात आले. उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये दर शुक्रवारी सुट्टी असेल आणि मोहरमसाठी दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, उर्दू माध्यम नसलेल्या शाळांना ही केवळ एक दिवसाची सुट्टी आहे. दिवाळीसाठी एक दिवस, होळीसाठी दोन दिवस आणि दुर्गापूजा आणि छठपूजेसाठी प्रत्येकी तीन दिवस सुट्टी असते.

यंदाच्या शाळेच्या कॅलेंडरमध्ये हरतालिकेला दोन दिवस आणि जितियाला एक दिवस सुट्टी होती. मात्र, या सुट्ट्या २०२४ मध्ये मिळणार नाहीत. तसेच, बिहारच्या शिक्षण विभागाने उर्दू माध्यमाच्या शाळा आणि उर्दू नसलेल्या शाळांसाठी स्वतंत्रपणे दोन कॅलेंडर जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anti hindu face bjp attacks nitish government for scrapping school holidays sgk

First published on: 28-11-2023 at 17:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×