काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या सुरन्या अय्यर यांनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याविरोधात तीन दिवसांचं व्रत ठेवलं होतं. तसंच सनातन धर्माबाबत सोशल मीडियावर अपशब्द लिहिले होते. या प्रकरणी आता सोसयाटीने सुरन्या अय्यर आणि मणिशंकर अय्यर यांना नोटीस बजावली आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल माफी मागावी किंवा घर सोडावं असं त्यात बजावण्यात आलं आहे. सुरन्या दिल्लीतल्या जंगपुरा भागातल्या सोसायटीत वास्तव्य करते.

सुरन्या अय्यर यांची फेसबुक पोस्ट

सुरन्या अय्यरने सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मणिशंकर अय्यर यांच्या मुलीने सुरन्या अय्यरने फेसबुकवर लिहिलं आहे की संबंधित रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन ही जी कॉलनी आहे तिथे मी वास्तव्य करत नाही. तसंच या विषयावरर मी माध्यमांशी बोलणार नाही असं मी ठरवलं आहे. कार भारतातली माध्यमं फक्त विष पसरवत आहेत. सगळेजण मला ओळखतात. मी माझं संपूर्ण आयुष्य म्हणजे ५० वर्षे विविध राजकीय दृष्टीकोन असलेल्या लोकांसह वाढले आहे, शिकले आहे. मी समाजासाठीही काम केलं आहे, चळवळींमध्येही भाग घेतला आहे. तूर्तास मी माझं म्हणणं फेसबुक आणि युट्यूब पेज इतकंच मर्यादित ठेवणार आहे. मीडियाच्या सर्कशीपासून मला वाचायचं आहे. भारतात आपल्याला आता सार्वजनिक संवादाची आवश्यकता आहे. शिव्या देणं, दुषणं देणं यापेक्षा काहीतरी वेगळा विचार आपण करु. या आशयाची पोस्ट सुरन्या अय्यर यांनी लिहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जंगपुरा भागात राहणाऱ्या सुरन्या अय्यर यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. तसंच तीन दिवस आपण उपवास ठेवला होता असंही त्यांनी म्हटलं. आईच्या हातून एक चमचा मध घेऊन मी माझा उपवास सोडला. सुरन्या अय्यर यांच्या या कृतीविरोधात सोसायटीने त्यांना नोटीस बजावली आहे. तसंच माफी मागा किंवा घर सोडून जा असंही या नोटिशीत म्हटलं आहे.