शहराच्या बाहेर असलेले ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ योगाभ्यास केंद्र आगीत खाक झाल्याची माहिती देत, या केंद्रास समाजकंटकांनी आग लावली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
बनी गाला भागातील ‘पीस स्ट्रीट’ येथे असलेल्या या केंद्रात शनिवारी सायंकाळी काही अज्ञात इसम पैशांची मागणी करीत घुसले आणि नंतर त्यांनी त्यास आग लावल्याचे पोलिसांनी सांगितले. या केंद्रात अवघे दोन रक्षक होते. सुमारे आठ जणांच्या जमावाने केंद्रातील पैशांची मागणी केली. हे पैसे कोठे आहेत, याची माहिती नसल्याचे रक्षकांनी सांगताच या जमावाने त्यांना बांधून ठेवत इमारतीस आग लावली. नंतर या गुन्हेगारांनी तेथून पलायन केले.
गुरू श्री श्रीरवीशंकर यांनी २०१२ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला असता त्यावेळी त्यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तानातील योगाभ्यास केंद्र आगीत खाक
शहराच्या बाहेर असलेले ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ योगाभ्यास केंद्र आगीत खाक झाल्याची माहिती देत, या केंद्रास समाजकंटकांनी आग लावली असावी
First published on: 10-03-2014 at 02:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art of living yoga centre set on fire in pakistan