भारतातील ७०० लोकांचे स्वीस बॅंकेत सहा हजार कोटी असल्याचा गौप्यस्फोट इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. केजरीवाल म्हणाले, एचएसबीसीच्या जीनेव्हा येथील बॅंकेच्या खात्यात सातशे लोकांची खाती असून फ्रान्स सरकारने ही यादी पाच वर्षांवूर्वीच केंद्र सरकारला सुपूर्त केली आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले, अनिल आणि मुकेश अंबानी यांचे शभर कोटी, जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांचे ८० कोटी, काँग्रेस खासदार अनू टंडन यांचे १२५ कोटी रुपये स्वीस बॅंकेच्या खात्यात जमा आहेत. हा सर्व पैसा कुठून आला आणि या सर्वांची चौकशी का होत नाही असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. आयकर खात्याने या सर्वांना नोटीस पाठवून त्यांची कसून चौकशी करावी असं ते पुढे म्हणाले. तसेच, काळा पैसा दडवण्यात एचएसबीसी बॅंकेचा मोठा हात असल्याचेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2012 रोजी प्रकाशित
स्वीस बॅंकेत ७०० भारतीयांचे ६ हजार कोटी रूपये जमा-केजरीवाल
भारतातील ७०० लोकांचे स्वीस बॅंकेत सहा हजार कोटी असल्याचा गौप्यस्फोट इंडिया इगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत केला.

First published on: 09-11-2012 at 02:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal targets blackmoney list