दिल्लीतील शाहीनबाग परिसरातील मंगोलपुरी आणि न्यू फ्रेंड्स कॉलनी भागातील अतिक्रमण काढण्यासाठी आज पुन्हा एमसीडीचे पथक बुलडोझरसह दाखल झाले आहे. या परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे. सोमवारीसुद्धा सकाळी अकराच्या सुमारास एमसीडीचे पथक अतिक्रमण हटवण्यासाठी तिथे पोहोचले होते. मात्र, लोकांच्या प्रचंड विरोधामुळे कोणतीही कारवाई न करता पथकाला परतावे लागले. शाहीन बागला राजकारणाचा आखाडा बनवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहीनबागेतील अतिक्रमणांवर कारवाईचा मुद्दा तापला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची कारवाई
अतिक्रमण हटवण्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगोलपुरी उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येते, तर न्यू फ्रेंड्स कॉलनी दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येते. या दोन्ही महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात आहेत.

अतिक्रमण हटवण्याची मोहीम एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत असल्याचा आरोप

शाहीनबागेतील ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विशेषत: उत्तर दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे हनुमान जयंती मिरवणुकीत झालेल्या जातीय हिंसाचारानंतर काही दिवसांनी ही मोहीम राबवण्यात आली आहे. या हिंसाचारात आठ पोलीस आणि एक नागरिक जखमी झाले होते. दिल्ली भाजपाचे प्रमुख आदेश गुप्ता यांनी उत्तर दिल्लीच्या महापौरांना पत्र लिहले होते. त्यात या भागातील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याची विनंती केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As bulldozers roll in again in delhi locality residents barricaded dpj
First published on: 10-05-2022 at 13:50 IST