कर्नाटकमध्ये शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून १५ ऑगस्ट रोजी दोन गटांत मोठा वाद झाला. या वादामध्ये एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाल्यामुळे जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, याच घटनेचा संदर्भ देत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठे विधान केले आहे. टिपू सुलतान यांनी चार वेळा इंग्रजांशी लढाई केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चार वेळा इंग्रजांशी माफी मागितली, असे ओवैसी म्हणाले आहेत. शनिवारी एका सभेला संबोधित करत होते.

हेही वाचा >> “पंडितजी आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय,” भाजपाच्या माजी आमदाराचे धक्कादायक विधान

“टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात युद्ध केले होते. आपल्याला ते विसरता येणार नाही. आज टिपू सलतान यांच्याविरोधात खोटी माहिती दिली जात आहे. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात चार युद्ध केली. तर दुसरीकडे सावरकरांनी इंग्रजांना चार वेळा माफीचे पत्र लिहिले. आज असे काही लोक आहेत, जे टिपू सुलतान यांच्याविरोधात रोष पसवरण्याचे काम करत आहेत. टिपू सुलतान यांनी दिलेल्या योगदानाला ते मिटवू पाहात आहेत,” असे ओवैसी म्हणाले. आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> स्वा. सावरकर फलक वाद: शिवमोगातील हल्ल्याप्रकरणी चार जणांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“टिपू सुलतान यांना हिंदूविरोधी म्हटले जाते. मात्र ज्या मुस्लिमांनी ब्रिटिशांची गुलामी स्वीकारली होती, त्यांचादेखील टिपू सुलतान विरोध करायचे. ज्या मराठा शासकांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, त्यांच्याविरोधातही टिपू सुलतान होते. कर्नाटकच्या नवाबने इंग्रजांविरोधात लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे टिपू सुलतान यांनी नवाबाचाही विरोध केला होता,” असेदेखील ओवैसी म्हणाले.