Assam Rape Case : आसाममधील कछार जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. धोलाईमध्ये शेजारच्या तरुणाने एका महिलेवर तिच्या मुलांसमोर बलात्कार केला आणि नंतर तिच्यावर अ‍ॅसिड फेकले आहे. दरम्यान ही घटना २२ जानेवारी रोजी घडली असून २३ जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणारा २८ वर्षीय आरोपी पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. तिच्या दोन मुलांच्या समोरच त्याने पीडितेला मारहाण केली, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिच्यावर अ‍ॅसिड फेकून आणि घटनास्थळावरून पळून गेला. जेव्हा पीडितेचा पती घरी आला तेव्हा पीडित पत्नीचे हात पाय बांधल्याचे आढळले.

दरम्यान, महिलेला सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस पीडितेच्या वैद्यकीय अहवालाचीही वाट पाहत आहेत. महिलेच्या पतीने आरोपी विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी पीडित महिलेल्या मोठ्या मुलाने, दिलेल्या माहितीवरून २३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा मुलगा सहा वर्षांचा आहे.

मुलांना मानसिक धक्का

“माझ्या दोन्ही मुलांनी हा संपूर्ण छळ पाहिला असल्याने त्यांनाही खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे,” असे महिलेचा पतीने सांगितले. पीडिचेच्या पतीने या धक्कादायक घटनेची माहिती देताना, पत्नीला न्याय आणि तिचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपी अटक करण्याची मागणी केली आहे.

मी घरी परतलो तेव्हा पत्नी…

या घटनेबद्दल अधिक माहिती देताना पतीने सांगितले की, “२१ जानेवारी रोजी संध्याकाळी आरोपी मी नसताना घरात जबरदस्तीने घुसला आणि पत्नीकडे फोन नंबर मागू लागला. पण याला तिने स्पष्टपणे नकार देत आरोपीला घराबाहेर होण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी पत्नीला धमकी देऊन निघून गेला. २२ जानेवारी रोजी, जेव्हा मी घरी परतलो तेव्हा, पत्नी जमिनीवर पडलेली दिसली. तिचे तोंड, हात आणि पाय बांधलेले होते आणि तिच्या शरीरावर अ‍ॅसिड टाकण्यात आले होते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी विवाहित महिलांना करायचा लक्ष्य

बलात्कार पीडितेच्या पतीने सांगितले पुढे असेही सांगितले की, आरोपीने यापूर्वीही परिसरातील महिलांशी गैरवर्तन केले होते. “तो विवाहित महिलांना लक्ष्य करतो, त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागतो आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी देखील लिहितो. अनेकवेळा, स्थानिकांनी त्यासा सुनावले होते. पण त्याने अशी कृत्ये थांबवली नाहीत”, असे पीडितेचा पती म्हणाला.