वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

कातील सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये दोष उद्भवल्यामुळे शुक्रवारी अनेक देशांनी ‘तंत्रकल्लोळ’ अनुभवला. ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज’ची कार्यप्रणाली कोलमडून टाकणारा हा बिघाड पूर्णपणे दूर करण्याचे प्रयत्न रात्रीपर्यंत सुरू होते. दरम्यान, शनिवारी भारतासह जगभरातील विमान कंपन्या, व्यावसायिक आणि सरकारी कंपन्या तंत्रज्ञानातील दीर्घ व्यत्ययानंतर त्यांच्या सर्व प्रणाली पुन्हा रूळावर आणण्यासाठी धावाधाव करत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>>नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; मुख्य सुत्रधारासह तिघांना अटक!

‘क्राऊड स्ट्राईक’ या सायबर कंपनीने सांगितले, की मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये ‘अपडेट’ दिल्यानंतर हा तांत्रिक बिघाड उद्भवला. हा बिघाड सुरक्षा किंवा सायबर हल्ला नव्हता, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. बिघाडाचा सर्वाधिक परिणाम शुक्रवारी विमान प्रवासावर झाला. विमान कंपन्यांनी हजारो उड्डाणे रद्द केली आणि आता त्यांची अनेक विमाने आणि कर्मचारी चुकीच्या ठिकाणी आहेत. विमानतळांवर ‘चेक इन’मध्ये समस्या येत होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्राऊडस्ट्राइक’ने विंडोजवरील बिघाड हा ‘फाल्कन एन सेन्सर’शी संबंधित असल्याचे सांगितले. तसेच आमचे अभियांत्रिकी पथक या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. नेमकी समस्या काय आहे, ते समोर आले आहे. आम्ही अपडेटबद्दल ग्राहकांना माहिती देत राहू, ग्राहकांनी अधिकृत चॅनेलद्वारे क्राऊडस्ट्राईकच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा. ग्राहकांची सुरक्षितता राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे कंपनीने सांगितले.