मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियात एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुजोर तरुण एका आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्याच्या कुब्री गावातील आहे.
आरोपी तरुणाचं नाव प्रवेश शुक्ला असून तो कुब्री गावातील रहिवासी आहे. आरोपी प्रवेश शुक्लाने याने एका आदिवासी मजुरावर दादागिरी करत त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर लघुशंका केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल
मंगळवारी रात्री आरोपी प्रवेश शुक्ला याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ आणि ५०४ आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने प्रवेश शुक्लाच्या घरावर बुलडोजर चढवला आहे. आरोपीच्या घराचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे. घराचा काही भाग पाडला आहे.
व्हिडीओत काय आहे?
एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केली आहे. आरोपीनं पीडित तरुणाच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर लघवी केली आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावची आहे.