रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी श्रीराम यांचे वाळूशिल्प साकारत निर्णयाचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Ayodhya verdict : राम मंदिरात जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय रद्द

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी श्रीराम यांचे वाळूशिल्प साकारले. ओडिशामधील पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर श्रीरामांचे वाळूशिल्प पटनायक यांनी साकारले. तसेच त्याचे फोटोही त्यांनी ट्विटवर शेअर केले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला. ३ महिन्याच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

Ayodhya verdict : अयोध्या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांचं पहिलं ट्विट

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी या आधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya verdict lord ram sand art sudarsan pattnaik odisha puri beach vjb
First published on: 09-11-2019 at 16:20 IST