Bangkok mass shooting Man kills 5 security guards Video : थायलंडची राजधानी बँकॉक येथे एका प्रसिद्ध फ्रेश फूड मार्केटमध्ये एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात किमान ६ लोकांचा मृत्यू झाला आहे.ही घटना ऑर टोर कोर मार्केटमध्ये घडली. बँकॉकमधील अत्यंत प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या चातुचक मार्केटपासून जवळच ही घटना घडली. या ठिकाणी विकेंडला अनेक पर्यटक भेट देतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञान बंदुकधारी व्यक्तीने पाच लोकांना गोळ्या घातल्या, ज्यामधअये चार सेक्युरिटी गार्ड होते आणि एक महिला होती. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

या मार्केटमधील सेक्युरिटी फुटेज समोर आले असून यामध्ये लोक घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये गोळीबाराचे आवाज देखील स्पष्टपणे ऐकायला मिळत आहेत.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात बंदुक घेऊन कार पार्किंगमधून मार्केटच्या दरवाजाकडे जात असलेला दिसत आहे. गोळीबार करणारा हाच व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे.

“पोलिस यामागील हेतू तपासत आहेत. आतापर्यंत तरी ही एक मास शूटिंगची घटना आहे,” अशी माहिती बँकॉकच्या बँग सु जिल्ह्याचे डेप्युटी पोलीस चीफ Worapat Sukthai यांनी वृत्तसंस्था एएफपीला दिली.

त्यांनी पुझे बोलाताना सांगितले की आरोपीने गोळीबार केल्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली आणि पोलिस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेच. तसेच शध्या थायलंड आणि कंबोडिया यांच्याच सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाशी याचा काही संबंध आहे का? याचा शोध देखील घेतला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थायलंडमध्ये अशा गोळीबाराच्या घटना नवीन नाहीत, कारण येथे बंदुकींना नियंत्रित करणारे कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही. त्यामुळे येथे बंदुका सहज उलबब्ध होतात.