पाकिस्तानातील १९ वर्षीय तरुणी आणि भारतातील २६ वर्षीय तरूण ऑनलाईन लुडो खेळतात. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होते. मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं आणि मग ती पाकिस्तानसोडून नेपाळमार्गे थेट भारतात येते. एखाद्या बॉलिवूड चित्रपट बनवता येईल अशी ही घटना बंगळुरूमध्ये उघडकीस आली आहे. बंगळुरू पोलिसांनी सोमवारी भारतात अवैधरित्या राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. इक्रा जेवानी आणि मुलायम सिंग यादव अशी या दोघांची नावं आहेत. तर मुलायम सिंग यादव हा उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे.

हेही वाचा – Video : कारच्या रुफवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स, हायवेवरील तो व्हिडीओ झाला व्हायरल

चार महिन्यांपूर्वी ऑनलाईन लुडो खेळताना इक्रा जेवानी आणि मुलायम सिंग यादव यांची ओळख झाली होती. यादरम्यान यांच्यात मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमांत झालं. मात्र, त्यानंतर मुलायम सिंग यादवला इक्रा पाकिस्तानी असल्याचं कळलं. पण तरीही दोघांनी आयुष्यभर एकत्र राहायची शपथ घेतली. इक्राला थेट भारतात आणणं कठीण असल्याने मुलायमने तिला नेपाळमधील काठमांडू येथे बोलावले. दोघांनी नेपाळमध्ये हिंदू धर्मपद्धतीने लग्न केलं आणि दोघेही भारतात आले. यावेळी इक्राने तिची ओळख बदलवून रावा यादव अशी केली. विशेष म्हणजे मुलायमने इक्राचे आधारकार्डदेखील बनवले होते.

हेही वाचा – स्पाईस जेट विमानात हवाईसुंदरीसोबत प्रवाशाची गैरवर्तणूक, दिल्ली विमानतळावर नेमकं काय घडलं? पाहा Video

दरम्यान, मागील काही दिवसांपासून एक पाकिस्तानी तरुणी अवैधरित्या बंगळुरूमधील सरजापूर भागात राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही अटक केली. चौकशीनंतर इक्रा पाकिस्तानी असल्याचे तिने पोलिसांना सांगितलं.

हेही वाचा – भर रस्त्यात बाईकवर एकमेकांना मिठी मारून किस केलं, Video व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पोलिसांनी इक्रा जेवानी, मुलायमसिंग यादव आणि दोघांना घर भाड्याने देणाऱ्या गोविंद रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच इक्रा जेवानीला इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये पाठण्यात आले असून तीला लवकरच पाकिस्तानात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.