अमेरिकेतील स्थित ‘बेड बाथ अॅण्ड बियाँड’ कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी गुस्तावो अर्नल यांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील उंच इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कंपनीने २० टक्के कर्मचारी कपात करण्याची आणि काही स्टोअर्स बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसातच गुस्तावो अर्नल यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूयॉर्कमधील मॅनहट्टम येथे बेड बाथ अॅण्ड बियाँडचं स्टोअर आहे. याच कंपनीचे ५२ वर्षीय सीएफओ गुस्तावो अर्नल शुक्रवारी दुपारी न्यूयॉर्कमधील गगनचुंबी इमारत ट्रिब्रेकाच्या १८ व्या मजल्यावरुन खाली पडले. या इमारतीला ‘जेंगा टॉवर’ म्हणूनही ओळखलं जातं.

कॅनडामध्ये खळबळ! चाकू हल्ल्यात १० जणांचा मृत्यू, १५ जखमी, दोन संशयितांचा शोध सुरु

गुस्तावो २०२० मध्ये ‘बेड बाथ अॅण्ड बियाँड’ कंपनीशी जोडले गेले होते. याआधी त्यांनी लंडनमधील एव्हन कॉस्मेटिक्स ब्रँडसाठी सीएफओ म्हणून काम केलं होतं. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये त्यांना २० वर्षांचा अनुभव होता.

पोलिसांना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाही.

गेल्या आठवड्यात, बेड बाथ अँड बियॉंडने आपण १५० स्टोअर्स बंद करणार असून, नोकरकपात करणार असल्याची घोषणा केली होती. तसंच तोट्यात असणाऱ्या व्यवसायासाठी नवं व्यापारी धोरण आखणार असल्याचं सांगितलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bed bath and beyond cfo gustavo arnal jumps from 18th floor new york jenga tower sgy
First published on: 05-09-2022 at 10:17 IST