scorecardresearch

भुपेंद्र पटेल घेणार आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदींसह राजकीय दिग्गज राहणार उपस्थित

आज भुपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

भुपेंद्र पटेल घेणार आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदींसह राजकीय दिग्गज राहणार उपस्थित
फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५६ जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भाजपा गुजरातमध्ये सातव्यांदा सत्ता स्थापन करणार असून आज भुपेंद्र पटेल २५ मंत्र्यांसह दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील.

हेही वाचा – पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या निवृत्तिवेतन योजनेचा निर्णय! ; हिमाचल प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

गांधीनगरमध्ये हा शपथग्रहण सोहळा पार पडणार असून यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. या ठिकाणी तीन भव्य व्यासपीठ आणि हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. तसेच देशभरातील २०० साधू-संतानाही या सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – घराणेशाहीच्या राजकारणापासून काँग्रेसची फारकत; हिमाचल प्रदेशात नवा पायंडा

दरम्यान, या सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 07:43 IST

संबंधित बातम्या