Exit Poll Projections for Bihar Assembly Elections 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडला, तर ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. बिहारच्या जनतेने एनडीएला कौल दिला की महागठबंधनला? की जन सुराज्य पक्षाला? हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी मतदान पूर्ण झाल्यानंतर संभाव्य निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत.
मतदानाआधी जाहीर झालेल्या ओपिनियन पोल्समधून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोल्सची आकडेवारी देखील सारखीच आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सद्वारे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक भास्कर, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीची निवड केली आहे.
Bihar exit poll : पीपल्स पल्सच्या (Peoples Pulse) एक्झिट पोल्सनुसार बिहारमध्ये एनडीएची सत्ता येईल
एनडीए : १३३ ते १५९
महागठबंधन : ७५ ते १०१
जनसुराज पक्ष : ० ते ५
इतर : २ ते ८
Bihar exit poll : पीपल्स इन्साइट्स – एनडीएला बहुमत
एनडीए : १३३ ते १४८
महागठबंधन : ८७ ते १०२
जनसुराज पक्ष : ० ते २
इतर : ३ ते ६
(हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेली आकडेवारी)
पीपल्स इन्साइट्स – पक्षनिहाय एक्झिट पोल्स
एनडीए
भाजपा – ६० ते ७२
जनता दल (संयुक्त) – ५५ ते ६०
लोकजनशक्ती पार्टी – ९ ते १२
हिंदुस्तान आवाम मोर्चा – १ ते २
राष्ट्रीय लोक मोर्चा – ० ते २
महागठबंधन
राष्ट्रीय जनता दल – ६५ ते ७२
काँग्रेस – ९ ते १३
डावे – ११ ते १४
विकासशील इन्सान पार्टी – २ ते ३
इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टी – ०
Matrize चे एक्झिट पोल्स
एनडीए – १४७ ते १६७
महागठबंधन – ७० ते ९०
पीपल्स पल्सच्या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कोणाला?
तेजस्वी यादव – ३२ टक्के
नितीश कुमार – ३० टक्के
प्रशांत किशोर – ८ टक्के
चिराग पासवान – ८ टक्के
सम्राट चौधरी – ६ टक्के
राजेश कुमार – २ टक्के
इतर – १४ टक्के
दैनिक भास्करच्या एक्झिट पोल्सनुसार बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता
एनडीए : १४५ ते १६०
महागठबंधन : ७३ ते ९१
जनसुराज पक्ष : ० ते ३
इतर : ५ ते ७
P-Marq च्या सर्वेक्षणानुसार एनडीएला बहुमत
एनडीए : १४२ ते १६२
महागठबंधन : ८० ते ९८
जनसुराज पक्ष : १ ते ४
इतर : ० ते ३
JVC च्या सर्वेक्षणानुसार एनडीएला बहुमत
एनडीए : १३५ ते १५०
महागठबंधन : ८८ ते १०३
जनसुराज पक्ष : ०
इतर : ३ ते ७
डीव्ही रीसर्चकडून बिहारमध्ये एनडीएच्या विजयाचा अंदाज व्यक्त
एनडीए : १३७ ते १५२
महागठबंधन : ८३ ते ९८
जनसुराज पक्ष : ० ते ४
इतर : २ ते ३
पोल डायरीचा एक्झिट पोल
एनडीए : १८४ ते २०९
महागठबंधन : ३२ ते ४९
इतर : १ ते ५
एबीपीचा एक्झिट पोल
एनडीए : १३३ ते १४८
महागठबंधन : ८७ ते १०२
इतर : ३ ते ५
चाणक्य स्ट्रॅटेजिसच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार
एनडीए : १३० ते १३८
महागठबंधन : १०० ते १०८
जनसुराज पक्ष : ०
इतर : ३ ते ५
