बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत चालेल्या अटीतटीच्या लढतीत एनडीएने महाआघाडीला धोबीपछाड देत सत्ता कायम ठेवली आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला कमी जागा मिळाल्या असल्या तरी तेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. अशात काँग्रेसकडून नितीश कुमार यांना भाजपाची साथ सोडण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत चालेल्या अटीतटीच्या लढतीत एनडीएने महाआघाडीला धोबीपछाड देत सत्ता कायम ठेवली आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला कमी जागा मिळाल्या असल्या तरी तेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. अशात काँग्रेसकडून नितीश कुमार यांना भाजपाची साथ सोडण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे.
आणखी वाचा- बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री?; नितीश यांना दिलेलं ‘ते’ आश्वासन ठरणार जुमला?
काँग्रेसनं नितीश कुमार यांच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवत ऑफर दिली आहे. काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत नितीश कुमार यांना सावध होण्याचा सल्ला दिला आहे. “भाजपा/संघ अमरवेलीसारखे आहेत. ज्या झाडाला वेढतात, ते झाड वाळून जात आणि वेल मात्र वाढीस लागते. नितीशजी, लालूजींनी आपल्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनात तुरुंगातही गेले आहेत. भाजपा-संघाची विचारधारा सोडून तेजस्वींना आशीर्वाद द्या. या अमरवेली रुपी भाजपा-संघाला बिहारमध्ये आश्रय देऊ नका,” असा राजकीय सल्ला देत काँग्रेसनं राजदसोबत येण्याची ऑफर दिली आहे.
भाजपा/संघ अमरबेल के समान हैं, जिस पेड़ पर लिपट जाती है वह पेड़ सूख जाता है और वह पनप जाती है।
नितीश जी, लालू जी ने आपके साथ संघर्ष किया है आंदोलनों मे जेल गए है भाजपा/संघ की विचारधारा को छोड़ कर तेजस्वी को आशीर्वाद दे दीजिए। इस “अमरबेल” रूपी भाजपा/संघ को बिहार में मत पनपाओ।— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
“नितीशजी, बिहार आपल्यासाठी छोटं झालं आहे. आपण भारताच्या राजकारणात यावं. सर्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं एकमत करण्यासाठी मदत करा आणि संघाची इंग्रजांनी रुजवलेली फोडा आणि राज्य करा नीतिला वाढू देऊ नका. याचा विचार जरूर करावा,” असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमारांना राष्ट्रीय राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे.
नितीश जी, बिहार आपके लिए छोटा हो गया है, आप भारत की राजनीति में आ जाएँ। सभी समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारा में विश्वास रखने वाले लोगों को एकमत करने में मदद करते हुए संघ की अंग्रेजों के द्वारा पनपाई “फूट डालो और राज करो” की नीति ना पनपने दें। विचार ज़रूर करें।
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
“महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल. आपण त्यांच्याच वारशातून निर्माण झालेलं नेतृत्व आहात. तिथे परत या. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, जनता पार्टी संघाच्या दुहेरी भूमिकेमुळेच फुटली होती. भाजपा संघाला सोडा आणि देशाला होणाऱ्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा,” असं आवाहन दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना केलं आहे.
आणखी वाचा- Bihar Election Result : जनतेनं पोकळ आश्वासनं, जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं – अमित शाह
यही महात्मा गॉंधी जी व जयप्रकाश नारायण जी के प्रति सही श्रद्धांजलि होगी। आप उन्हीं की विरासत से निकले राजनेता हैं वहीं आ जाइए। आपको याद दिलाना चाहूँगा जनता पार्टी संघ की Dual Membership के आधार पर ही टूटी थी। भाजपा/संघ को छोड़िए। देश को बर्बादी से बचाइए।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी घोषित करण्यात आले. निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या असल्या तरी नितीश कुमार यांच्या जदयूची पीछेहाट झाली आहे. त्यावरून जदयूच्या जागा कमी होण्यामागे भाजपाची रणनीती असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.