तुमच्या बँक खात्यात अचानक एका दिवशी कोट्यावधी रुपये जमा झाले तर? बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासोबत असं घडलं आहे. शेतकरी राम बहादूर शाह यांच्या पेन्शन खात्यात चुकून चक्क ५२ कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, त्यानंतर या शेतकऱ्याने सरकारकडे एक आवाहन केलं आहे. आपल्या खात्यात चुकीने जमा झालेल्या या ५२ कोटींपैकी काही पैसे मला स्वतःसाठी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या वृद्ध शेतकऱ्याने केली आहे. किमान उर्वरित आयुष्यात तरी आपल्याला आर्थिक ताणाचा सामना करावा लागू नये म्हणून त्यानी सरकारकडे ही मागणी केल्याचं समजतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्हाला यापैकी काही रक्कम द्यावी. जेणेकरून आम्ही आमचं उर्वरित आयुष्य सुरळीतपणे घालवू शकू”, असं आवाहन राम बहादूर शाह यांनी सरकारकडे केल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे. कटिहार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याने आपल्या पेन्शनच्या खात्याची स्थिती विचारण्यासाठी, अपडेट मागण्यासाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्राशी (सीएसपी) संपर्क साधला तेव्हा चुकून आपल्या पेन्शन खात्यात करोडो रुपये जमा झाले आहेत हे त्यांना कळलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar farmer receives 52 crore rupees pension account gst
First published on: 18-09-2021 at 14:21 IST