बिहारच्या बंका जिल्ह्यात डोकं चक्रावून टाकणारा प्रकार घडला आहे. जावयाच्या सासूवर प्रेम जडल्याचे कळल्यानंतर सासऱ्याने आनंदाने दोघांचे लग्न लावून दिले. तसेच दोघांचे नोंदणीपद्धतीनं रितसर लग्न लावून देण्यातही सासऱ्याने पुढाकार घेतला आहे. सिकंदर यादव (वय ४५) नामक जावई आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या सासरी राहण्यासाठी गेला. दरम्यानच्या काळात त्याचे सासू गीता देवी (५५) यांच्यावर प्रेम जडले. मात्र सासरे दिलेश्वर दर्वे यांना याबाबतची कुणकणु लागली. त्यानंतर त्यांनी तपास केला असता सासू आणि जावई रंगेहात पकडले गेले.

सत्य कळल्यानंतर सासरे दर्वे यांनी ही बाब तात्काळ गावच्या पंचायतीसमोर मांडली. जावई यादवनेही सासूवर प्रेम असल्याचे मान्य केले. सध्या सोशल मीडियावर या आगळ्यावेगळ्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये यादव आपल्या सासूच्या भांगेत कुंकू भरत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत गावातील ग्रामस्थही असून ते या लग्नाचा आनंद व्यक्त करताना आणि टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

सासरे दर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांनी स्वखुशीने या लग्नाला परवानगी दिली. जेव्हा ग्रामस्थांसमोरच जावई आणि सासूचे लग्न पार पडले. त्यानंतर त्या दोघांच्या रजिस्टर विवाहासाठी सासऱ्यांनीच पुढाकार घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक्सवर एनपी हिंदी या हँडलवरून पहिल्यांदा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. काहींनी या प्रकारावर टीका केली आहे. तर काहींनी जावई आणि सासू यांना पाठिंबा दर्शविला आहे. एनपी हिंदी या एक्स अकाऊंटच्या खाली अनेकांनी कमेंट केली आहे. त्यापैकी एकाने म्हटले की, या निर्णयाचा सासऱ्यालाच अधिक फायदा झालेला दिसतो. एका झटक्यात सासरा जबाबदारीतून मूक्त झाला आहे. आता तो गोव्यात जाऊन मजा करायला मोकळा झाला आहे. आणखी एका युजरने म्हटले, “या लग्नादरम्यान लहान मुले टाळ्या का वाजवत आहेत?”