बिहारमधील (Bihar) भागलपूर (Bhagalpur) जिल्ह्यात नवगछिया रेल्वे स्टेशनवर (Naugachia Railway Station) एका ट्रेनमध्ये (Train) कासवांची मोठी तस्करी होत असल्याचं उघड झालंय. तपासणी दरम्यान या रेल्वेत ४२ गोण्यांमध्ये तब्बल ९३५ कासव (Turtles) सापडले. या प्रकरणी पोलिसांनी (Police) ५ महिलांसह ८ तस्करांना अटक केलं आहे.

गुप्त माहितीच्या आधारे छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (५ फेब्रुवारी) पूर्व मध्य रेल्वेच्या नवगछिया रेल्वे स्टेशनवपर तस्करीची गुप्त माहिती (Secret Information) मिळाली. त्या आधारावर अंबेडकरनगर कामाख्या साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये शोध अभियाना (Checking Campaign) चालवण्यात आलं. या दरम्यान एका डब्यात तपासणी करताना काही गोण्यांमध्ये कासव असल्याचं आढळलं.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई

४२ छोटछोट्या बॅगमध्ये ९३५ कासव

रेल्वे पोलिसांनी (RPF) दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेत ४२ गोण्या (Bags) सापडल्या आहेत. यात तस्करांनी एकूण ९३५ कासव चालवले होते. या प्रकरणी पोलिसांनी ५ महिलांसह ३ युवक अशा एकूण ८ जणांना अटक केली. जप्त कासवांसह आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे.

हेही वाचा : VIRAL VIDEO: माणसाच्या आकाराएवढा कासव पाहिलाय का? मग हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा

जप्त कासव सुंदरी प्रजातीचे

वन विभागाने (Forest Department) दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जप्त केलेले कासव सुंदरी प्रजातीचे आहेत. हे सर्व कासव सध्या भागपूरच्या सुंदरवन येथे ठेवण्यात आले आहेत. त्यांना नंतर गंगा नदीत सोडून देण्यात येणार आहे.