बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारने सुटका केली होती. गुजरात सरकारच्या या निर्णयावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अनेकांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. तर सोशल मीडियावरही निर्णयाचा विरोध करण्यात आला. मात्र, आता हे दोषी सुटका झाल्यानंतर ते गावातून पळून गेले असून त्यांच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी आली असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा – अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार? माणिकराव ठाकरे म्हणाले, “काल नांदेडच्या बैठकीत…!”

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील दोषींच्या कुटुंबियांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या दोषींपैकी शैलेश भट्ट आणि मितेश भट्ट घरांना कुलूप आहे. तर शैलेश भट्ट (६३) याचे घरही बंद आहे. सुटका झाल्यापासून शैलेश भट्ट आणि मितेश भट्ट हे दोघेही घरी कमी राहत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – Yakub Memon: ‘उद्धव ठाकरेंनी माफी मागावी’ म्हणणाऱ्या भाजपाला आदित्य ठाकरेंचा प्रश्न, “लादेनला समुद्रात दफन केलं, तसं याकूब मेमनला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या दोषींचे नातेवाईकही संकटात आहे. या प्रकरणातील काही दोषींच्या घरांची दुरवस्था झाली असून त्यांच्याकडे जेवणासाठी पुरेसे पैसे नाहीत, असे कुटुंबाचे म्हणणे आहे. ते जवळच्या शेतात रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. “माझे पती तुरुंगातून बाहेर आल्यापासून एका विशिष्ठ समुदायातील लोक त्यांच्या मागे लागले आहेत”, अशी माहिती दोषींतील एकाच्या पत्नीने दिली आहे. आम्ही बाजारात गेलो किंवा कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडलो. तर ते आमचे फोटो काढतात आणि व्हिडिओ बनवतात. तसेच आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतात, असेही ती म्हणाली.