सत्ताधारी भाजपाच्या विरोधात देशातील बहुतेक प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून एकत्र लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय आघाडीकडून जाहीर करण्यात आला आहे. या आघाडीवर सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने टीका केली जात असताना ममता बॅनर्जींच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या हातात आयतं कोलीत मिळाल्याचं बोललं जात आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये आल्या असताना घडलेल्या या प्रसंगावरून भाजपानं टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. “ममता बॅनर्जींना नमाज पठन करण्यात कोणतीही अडचण नाही. पण त्यांना गंध लावून घेण्यात अडचण आहे. ममता बॅनर्जी यांना हिंदुमिसियाचा आजार झाला आहे. ही आहे विरोधी पक्षांची धर्मनिरपेक्षता. पश्चिम बंगालच्या नागरिकांना त्यांच्या याच वृत्तीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे”, असं अमित मालवीय यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

इंडिया आघाडीने मुंबईतल्या बैठकीत घेतले दोन मोठे निर्णय, राहुल गांधी माहिती देत म्हणाले…

काय आहे व्हिडीओमध्ये?

इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी देशभरातून विरोधी पक्षांची नेतेमंडळी हजर होती. यावेळी मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेत्यांचं स्वागत केलं जात होतं. यावेळी ममता बॅनर्जी हॉटेलच्या प्रवेशद्वारातून आत येत असताना मराठमोळ्या वेशातील तरुणींनी त्यांना आरतीच्या ताटातून गंध लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हात जोडून ममता बॅनर्जींनी स्मितहास्य करत त्याला नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुद्द्यावरून भाजपानं आता ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.