गोड्डा/देवघर (झारखंड)

भाजपने जनादेश डावलून झारखंडमधील सरकार ‘चोरी’ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी शनिवारी केला. जनादेशाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसने हस्तक्षेप केल्याचेही त्यांनी सांगितले. गोड्डा जिल्ह्यातील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान एका मेळाव्याला संबोधित करताना, गांधींनी जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि भाजपच्या विचारसरणीला विरोध करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर जोर दिला. त्यानंतर ते देवघर येथे पोहोचले आणि प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ धाम येथे ‘रुद्राभिषेक’ला हजेरी लावली. तसेच कुवानसिंग चौकातील रॅलीला संबोधित केले.

हेही वाचा >>> ईडी’ केजरीवाल यांच्याविरुद्ध न्यायालयात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी ते म्हणाले, ‘‘देशातील तरुणांना रोजगार हवा आहे. मात्र, भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी देशात बेरोजगारीचा आजार पसरवला आहे. या नवीन आजाराने भारतीय तरुणांना बाधित करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.’’ देशातील आदिवासी, दलित आणि मागासवर्गीय लोकांची खरी आकडेवारी जाणून घेण्यासाठी जातीय जनगणना करण्यावरही त्यांनी भर दिला. राहुल म्हणाले, ‘‘देशात आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांवर अन्याय वाढत आहेत.’’ १४ जानेवारीला मणिपूर येथून सुरू झालेली ही यात्रा शनिवारी सकाळी गोड्डा जिल्ह्यातील सरकंदा चौकातून सुरू झाली.