नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरणामधील अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी बजावलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, दिव्या मल्होत्रा यांनी शनिवारी युक्तिवाद ऐकल्यानंतर, उर्वरित युक्तिवाद आणि ईडीने दाखल केलेल्या नव्या तक्रारीवर विचार करण्यासाठी ७ फेब्रुवारीला पुढील सुनावणी ठेवली आहे.

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
pune, case registered, Former Minister Balasaheb Shivarkar, House Grabbing, dhananjay pingale, police, pune news, pune House Grabbing case, marathi news,
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

हेही वाचा >>> अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची पहिली भेट कुठे झाली होती? वाचा रंजक किस्सा

२ फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांना ईडीने मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात पाचव्यांदा बजावलेले  समन्स नाकारले. त्यांनी पाचव्या समन्सकडे दुर्लक्ष करून त्याला ‘बेकायदा’ ठरवले आहे.

नोटीस सुपूर्द करण्यावरून नाटयमय घडामोडी

केजरीवाल यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी शनिवारी गुन्हे शाखेचे पथक पुन्हा दाखल झाले. या पथकातील सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथकाने आग्रह धरला की, नोटीस केजरीवाल यांच्या नावे असल्याने ते केजरीवाल यांनाच नोटीस सुपूर्द करतील. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की ते नोटीस घेऊन पोच देण्यास तयार आहेत. मात्र, त्यास पोलीस तयार नसल्याने त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.