भाजपाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासह कन्नड कॉमेडियन अभिनेता एस. जग्गेश यांना राज्यसभेसाठी कर्नाटकातून उमेदवारी दिलीय. कर्नाटकमध्ये राज्यसभेसाठी कर्नाटकमधील नेत्यांनाच प्राधान्य देण्याचा आग्रह होत आहे. त्यामुळे निर्मला सितारमण यांना सुरक्षित जागा म्हणून भाजपाचा दबदबा असलेल्या उत्तर प्रदेशमधून संधी दिली जाईल असं बोललं जात होतं. मात्र, भाजपाने हे अंदाज खोटे ठरवले आहेत.

कर्नाटकात भाजपाकडे १२१ आमदारांचं संख्याबळ आहे. २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत राज्यसभेच्या एका जागेसाठी ४५.२ मतदान आवश्यक आहे. त्यामुळे कर्नाटकमधून भाजपाचे दोन उमेदवार तर निश्चितपणे निवडून येत आहेत.

कर्नाटकमध्ये राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी स्थानिक नेत्यांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. याबाबत सोशल मीडियावर मोहिमही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने निर्मला सितारमण यांच्यासोबत एस. जग्गेश यांना उमेदवारी दिलीय. याशिवाय जग्गेश दक्षिण कर्नाटकामधील बहुसंख्य वोक्कालिगा समाजाचे नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता भाजपाने या समाजामध्ये संदेश देण्याचंही काम केलंय.

हेही वाचा : “RSS चा भगवा झेंडा राष्ट्रीय ध्वज बनणार…”, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचं खळबळजनक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे जग्गेश आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी २००८ मध्ये भाजपात प्रवेश केला. त्याचवर्षी भाजपावर घोडेबाजाराचा आरोपासाठी कारणीभूत ठरलेलं ऑपरेशन लोटस कर्नाटकात राबवलं केलं होतं.