घरात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने मौलवींकडून आपल्याला धमकी दिली जात असल्याचा दावा भाजपा नेत्या रुबी खान यांनी केला आहे. रुबी खान यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. राम मंदिराची पायाभरणी झाली आणि घरात पूजा केली तेव्हा आपल्याविरोधात फतवा काढण्यात आला होता असा दावाही त्यांनी केला आहे.

“मी माझ्या घऱात सात दिवसांसाठी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. गणपतीच्या मूर्तीचं विसर्जनही मनोभावे करणार आहे. राम मंदिराची पायाभरणी झाल्यानंतरही, मी माझ्या घरात पूजा केली होती. यानंतर माझ्याविरोधात फतवा काढण्यात आला होता,” अशी माहिती रुबी खान यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते सर्व माझ्याविरोधात उभे राहिले आहेत. त्यांना माझी हत्या करायची आहे. मला धमक्या मिळत आहेत. मी घाबरणारी व्यक्ती नाही. मी गणेशमूर्तीचं विसर्जन करणार असून, माझे पती माझ्या पाठीशी आहेत,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.