मेनका गांधींबद्दल भाजपा आमदाराच्या आक्षेपार्ह ट्वीटने खळबळ!

अजय बिष्णोई अनेकवेळा आपल्याच सरकारच्या कारभारावर प्रश्न विचारत असतात

BJP MLA offensive tweet about Maneka Gandhi created a stir
मेनका गांधी यांच्यावर पशुवैद्यकांशी अभद्र भाषेत बोलल्याचा आरोप ( photo indian express)

मध्य प्रदेशचे माजी आरोग्यमंत्री आणि पाटणचे भाजपाचे आमदार अजय बिष्णोई यांनी ट्वीट करून आपल्याच पक्षाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना ‘घटिया महिला’ म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी मेनका गांधींची एक ऑडिओ टेप व्हायरल झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर पशुवैद्यकांशी अभद्र भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अजय बिष्णोई अनेकवेळा आपल्याच सरकारच्या कारभारावर प्रश्न विचारत असतात. शनिवारी त्यांनी ट्वीट करून म्हटले की, “खासदार श्रीमती मनेका गांधी यांनी पशुवैद्य डॉ. विकास शर्मा यांच्याशी जे बोलले ते पशुवैद्यकीय महाविद्यालय जबलपूर हे घटिया दर्जाचे असल्याचे सिद्ध होत नाही, परंतु यामुळे मेनका गांधी अत्यंत घटिया महिला असल्याचे सिद्ध होते. ते माझ्या पक्षाचा खासदार आहेत, याची मला लाज वाटते.”

काय आहे प्रकरण?

व्हायरल झालेल्या ऑडिओ टेपमध्ये मेनका गांधी जबलपूरच्या नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठाचे पशुवैद्यकीय डॉक्टर विकास शर्मा यांच्याशी संभाषण करीत आहेत. या दरम्यान त्यांनी संपूर्ण पशुवैद्यकीय महाविद्यालयाला घटिया म्हटले होते. हा ऑडिओ २१ जूनचा आहे. डॉ. विकास शर्मा आणि डॉ. एल.एन. गुप्ता यांनी एका श्वानावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांचा असा आरोप आहे की मेनका गांधींनी त्यांना फोन करून धमकावले आणि श्वानाच्या उपचारासाठी ७०,००० रुपये देण्यास सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp mla offensive tweet about maneka gandhi created a stir srk

ताज्या बातम्या