देशात करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. असातच गेल्या काही दिवसांमध्ये देशातील काही नेत्यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता आणखी एका केंद्रीय मंत्र्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी करोनाची चाचणी केली आणि त्या चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. मी आता होम आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी,” असं श्रीपाद नाईक म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

श्रीपाद नाईक यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनादेखील करोनाची लागण झाली होती. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आपल्याला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांनादेखील करोनाची लागण झाली होती. देशात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत देशात २३ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण धआली आहे. तर दुसरीकडे करोनामुळे ४६ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १६ लाख रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp ayush minister goa shripad naik tested coronavirus positive home isolation informed on twitter jud
First published on: 12-08-2020 at 19:59 IST