पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात काही नागरिकांनी बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर शहरभर लावले आहेत. घरांच्या भिंती, रेल्वे स्थानक आणि वाहनांवर हे पोस्टर्स चिटकवले आहेत. त्यामुळे शहरभर एकच चर्चा सुरू आहे. भाजपा खासदार सनी देओल लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत, त्यामुळे स्थानिक लोकांनी खासदाराविरोधात रोष व्यक्त केला आहे.

सनी देओल हे पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार आहेत. लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ते लोकांना कधी भेटलेच नाहीत. शिवाय ते कधीही आपल्या मतदारसंघात गेले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये सनी देओलबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे लोक शहरभर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावून संताप व्यक्त करत आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदारावर नाराज असलेल्या एका स्थानिक तरुणाने सांगितलं, “जर त्यांना काम करायचं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. खासदार झाल्यानंतर ते कधीही गुरुदासपूरला आले नाहीत. ते स्वतःला पंजाबचे सुपुत्र म्हणवतात पण त्यांनी कोणताही औद्योगिक विकास केला नाही. खासदार निधीचे वाटप केले नाही. केंद्र सरकारची कोणतीही योजना येथे आणलेली नाही.