दोन वर्षांतील पहिल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्वीकारलेल्या राजकीय ठरावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि विरोधी पक्षावर “संधीवाद” आणि द्वेषपूर्ण मानसिकतेने वागण्याचा आरोप केला. या ठरावामध्ये कोविड परिस्थिती हाताळणे ते हवामान बदलाबाबत मोदींनी मांडलेली भूमिका याचं कौतुक करण्यात आलं आहे. १८ मुद्द्यांचा समावेश असलेला हा जाहीरनामा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मांडला.

पेट्रोल-डिझेलवरच्या उत्पादन शुल्कातली कपात आणि अशाच कल्याणकारी निर्णयांमुळे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर इथल्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रविवारी झालेल्या एकदिवसीय बैठकीचा केंद्रबिंदू येत्या विधानसभा निवडणुकांवर होता. त्यात आदित्यनाथ यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांसह तसेच उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबच्या भाजप अध्यक्षांनी आपलं मतप्रदर्शन केलं. समापन सत्राला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा उल्लेख केला आणि आगामी निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त केला.

या ठरावात म्हटले आहे की, मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर नवीन उंची गाठत असताना, विरोधक केवळ अत्यंत द्वेषाच्या मानसिकतेने वागत होते आणि षड्यंत्राद्वारे कोविड लसीकरण कार्यक्रमाचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करत होते, चुकीची माहिती पसरवत होते. “साथीच्या रोगाच्या काळात विरोधी पक्ष कधीही रस्त्यावर उतरले नाहीत आणि संशय पसरवण्यासाठी स्वतःला ट्विटरपर्यंतच मर्यादित ठेवले,” असं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ठरावाच्या ब्रीफिंगमध्ये सांगितले.