बिहारमधील भाजपचे आमदार अवनिशकुमार सिंग आणि राणा गंगेश्वर सिंग यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपमधून निलंबित करण्यात आले असल्याचे बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले.पक्षाने नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली असून सदर दोन आमदारांचे वक्तव्य पक्षाच्या विचारसरणीशी विसंगत असल्याचे आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सदर आमदारांचे वर्तन पक्षविरोधी होते. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता, असे पांडे म्हणाले.
भाजपचे अन्य काही आमदारही जद(यू)शी जवळीक साधत असल्याचे वृत्त आले आहे, असे विचारले असता मंगल पांडे म्हणाले की, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कारवायांवर बारीक नजर ठेवली जात आहे. कोणी पक्षविरोधी कारवाया करताना आढळला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असे पांडे म्हणाले.
  संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित  
 पक्षविरोधी कारवायाबद्दल भाजपचे दोन आमदार निलंबित
बिहारमधील भाजपचे आमदार अवनिशकुमार सिंग आणि राणा गंगेश्वर सिंग यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपमधून निलंबित करण्यात आले असल्याचे बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले.
  First published on:  07-02-2014 at 12:26 IST  
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp suspends two mlas for praising bihar cm nitish