भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आघाडीवर आहेत. भाजपाने इथून साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आला. सर्वांचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याबरोबर साध्वी प्रज्ञा यांची लढत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून साध्वी प्रज्ञा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. सहाव्या टप्प्यात १२ मे रोजी भोपाळमध्ये मतदान झाले.

भोपाळ हा भाजपाचा गड असून साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे पंतप्रधान मोदींपासून वरिष्ठ नेत्यांनी समर्थन केले होते. साध्वी प्रज्ञा ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरें यांच्याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच वादग्रस्त वक्तव्य केले होते. नंतर त्यांना माफी मागावी लागली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps pragya singh thakur leading from bhopal over digvijaya singh
First published on: 23-05-2019 at 09:35 IST